घरCORONA UPDATEसंतापजनक! ९० वर्षीय कोरोनाबाधित आजीला जंगलात टाकून कुटुंब फरार

संतापजनक! ९० वर्षीय कोरोनाबाधित आजीला जंगलात टाकून कुटुंब फरार

Subscribe

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या कोरोनाने माणुसकी संपत चालली आहे असच दिसत. दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ९० वर्षीय आजीला कच्चीघाटी परिसरातील जंगलात टाकून नातेवाईक फरार झाले आहेत.

या आजीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना सरकारी रूग्णालयाला कळवणे आणि रूग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. पण कुटुंबियांनी तिला जंगलात सोडलं. वय झाल्यामुळे आजीला हालचाल करणेही कठीण होते. अशा परिस्थिती काळजी करणं गरजेचं होतं. पण, नातेवाईकांनीच या वृद्ध महिलेला जंगलात नेऊन टाकले.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आजीबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी  दाखल झाले. त्या वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आजीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हे ही वाचा – धक्कादायक! दिशा सॅलिअनच्या आत्महत्येआधीच्या पार्टीचा व्हिडिओ आला समोर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -