Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर ताज्या घडामोडी Corona: पुण्यात दिवसभरात ९३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, १४ जणांचा मृत्यू

Corona: पुण्यात दिवसभरात ९३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, १४ जणांचा मृत्यू

आज पिंपरी-चिंचवडमध्ये ३१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ३ हजार ५४४वर पोहोचला आहे.

Pune
2601 new corona patient found and 44 deaths today in pune
पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात पुण्यात ९३७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १४ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ४२वर पोहोचला असून मृतांचा आकडा ६७६ झाला आहे. तसेच ६३१ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात ११ हजार ६७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तसेत आज पिंपरी-चिंचवड शहरात ३१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ५४४ वर पोहोचला आहे. तसेच आज १६८ कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज सर्वाधिक ६ हजार ३३० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच १२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार ६२६वर पोहोचला असून ८ हजार १७८ मृतांचा आकडा झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आज राज्यात ८ हजार १८ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.


हेही वाचा – Corona Update: दिलासादायक! मुंबईत आज ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!