Corona Update: राज्यात २४ तासात ९,५०९ नवे रूग्ण, तर २६० मृत्यू!

Mumbai

राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के एवढे झाले आहे.

 

तर सध्या राज्यात ९ लाख २५ हजार २७९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७ हजार ९४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here