घरताज्या घडामोडीCorona: नागपूरमध्ये २४ तासांत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Corona: नागपूरमध्ये २४ तासांत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

नागपूर शहरात आज, मंगळवारी ९७७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर २४ तासांत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून नागपूर शहरामध्ये अधिकच घट्ट झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहरात आज, मंगळवारी ९७७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर २४ तासांत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार पार

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार ३६१ वर पोहोचला आहे. तर मृत्यूसंख्या ३७२ वर गेली आहे. आज जिल्ह्यात १४६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यातील २ हजार १८९ रुग्ण एकट्या नागपूर शहरातील असून १ हजार २७३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर कोविड विषाणूची लागण झाल्याचा संशयावरून जिल्ह्यात २ हजार २०० जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यापैकी शहरातून ६६२ तर ग्रामीण भागातून ३१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

६१२ जणांचा अहवाल खासगीतून झाला प्राप्त

कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी सर्वाधिक ६१२ जणांचा अहवाल खासगी लॅबमधून प्राप्त झाला आहे. त्यानंतर १४५ मेयोतून, १०५ मेडिकलमधून, ५८ अँटिजन रॅपिड टेस्टमधून तर ५७ एम्समधून पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनाची बाधा झालेल्या सर्वाधिक ३८९ सक्रिय रुग्णांवर सध्या मेडिकलमध्ये तर २६४ जणांवर मेयोत उपचार सुरू आहेत.

  • कोरोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण -४७५
  • एकूण सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण – २७५४६
  • आजचे पॉझिटिव्ह रुग्ण – ९७७
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – १०३६१
  • आजचे करोनामुक्त – १४६
  • एकूण करोनामुक्त – ५०१५
  • आज तपासलेले नमुने – २२००
  • एकूण तपासलेले नमुने – १०३३१९

    हेही वाचा – Corona: रत्नागिरीत १०१ नव्या रुग्णांची नोंद; ३ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -