घरमहाराष्ट्ररेल्वे रूळांची विश्वासार्हता वाढतेय

रेल्वे रूळांची विश्वासार्हता वाढतेय

Subscribe

तडा जाण्याच्या घटनांत 50 टक्क्यांनी घट

उपनगरीय रेल्वेची वाहतूक विस्कळित होण्याची अनेक कारण आहे. त्यातील एक कारण म्हणजे रेल्वे रुळाला तडे जाणे. मात्र मध्य रेल्वेने गेल्या चार वर्षांत नियमित रेल्वे रुळाची देखभाल आणि मेगाब्लॉक काळात केलेल्या कामांमुळे यात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. 2014 ला रेल्वे रुळाला 62 वेळा रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत 2019 मध्ये फक्त 30 घटना झाल्या आहेत.त्यामुळे उपनगरी लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण सुध्दा कमी झाले आहे. त्यामुळे तुलनेने लोकलचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून मध्य रेल्वे मार्गावर कसारा-खोपोलीपर्यंत तर हार्बरवर पनवेलपर्यंत उपनगरी रेल्वेसेवा चालते. मध्य रेल्वे मार्गावर दिवसभरात १774 फेर्‍या, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर 856 फेर्‍या तर हार्बरवर 614 फेर्‍या होतात. ठाणे-वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावर २62 फेर्‍या तर बेलापूर- उरण मार्गावर 40 फेर्‍या अशा एकूण 1774 लोकल फेर्‍या प्रत्येक दिवशी धावतात.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून रोज सुमारे 45 लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे. 320 किलीमिटर मध्य रेल्वेचा रुट आहे. मात्र या रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रमाण सर्वाधिक हिवाळ्यात असते. वातावरणातील बदलाचा फटका रेल्वे रुळांना बसतात. त्यामुळे हिवाळ्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे जाऊन लोकल सेवा विस्कळीत होते.

मध्य रेल्वेकडून या घटना कमी करण्यासाठी नेहमीच रेल्वे रूळाची देखभाल केली जाते. गेल्या एका वर्षात 60 किलोमिटरचा रेल्वे रुळ बदलविण्यात आला आहे. 54 किलो मिटरचे स्लीपर सुध्दा बदलविण्यात आले आहेत. तसेच 80 किलो मिटर रेल्वे मार्गांवरील खडी मशीनच्या माध्यमातून ट्रॅक ट्रेन ऑपरेशनसाठी व्यवस्थित राहील असा बनवला आहे. Ultrasonic Flaw Detection ही वेळेवर केले जात आहे . यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.- शिवाजी सुतार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisement -

पाच वर्षांत 226 वेळा तडे

मध्य रेल्वे मार्गांवर रेल्वे रुट 320 किलो मिटरचा आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षांत 226 वेळा रेल्वे रुळाला तडे जाण्याचा घटना घडल्या आहे. 2015-16 मध्ये 62 वेळा मध्य रेल्वे मार्गांवर रेल्वे रुळाला तडे गेले होते. मात्र रेल्वे रुळाला तडे जाण्याचा घटना प्रत्येक वर्षी कमी कमी होत जात आहे. 2019 मध्ये 50 टक्यांनी कमी झाले आहे. या घटना सिंगल डिझीटवर आणण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

रेल्वे रूळांची विश्वासार्हता वाढतेय

वर्ष रेल्वे रुळाला तडे
2014-15 – 62
2015-16- 56
2016-17 – 45
2017-18- 33
2018-19 – 30

एकूण -226

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -