जम्मू-काश्मीरमधील चकमकीत उचगावच्या सुपूत्राला वीरमरण

आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत राहुल यांचे पार्थिव उचगावला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

belgaum
a army soldier from belgaum martyr in encounter in Kashmir

जम्मू-काश्मीर येथील पूंछ भागात गुरुवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत बेळगावमधील उचगावच्या सुपूत्राला वीरमरण आले. राहुल भैरू सुळगेकर असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. राहुल शहीद झाल्याची बातमी कळताच उचगाव गावावर शोककळा पसरली. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत राहुल यांचे पार्थिव उचगावला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

वडील, मोठा भाऊ सुद्धा सैनिक

गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे बंदोबस्तावर असलेले जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत राहुल सुळगेकर हा जवान शहीद झाला. चार वर्षांपूर्वी राहुल हे मराठा लाईट इन्फंट्रीतून सैन्य दलात भरती झाले होते. राहुल यांचे वडील निवृत्त सैनिक असून राहुल यांचा मोठा भाऊसुद्धा सैन्य दलात कार्यरत आहे.