घरमहाराष्ट्ररोह्यात अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा दाखल

रोह्यात अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा दाखल

Subscribe

रोह्यात एका कंपनीतील कामगारासोबत घृणास्पद प्रकार घडला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे घडल्याचे उघडकीस आल्याने येथे खळबळ उडाली आहे. परिसरातील धाटाव एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत रात्रपाळीला असलेल्या एका कामगाराबाबत ही घटना घडली. दरम्यान, कामगारासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या त्या समलिंगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीत इन्चार्ज पदावर काम करीत असलेल्या अधिकारी व्यक्तीने हा प्रकार केल्याने अनेकांनी राग आणि चिंता व्यक्त केली आहे. या अधिकार्‍याने फिर्यादीला अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने सीएफची बॅग घेऊन पॅकिंग रूममध्ये बोलाविले. फिर्यादीच्या शेजारी झोपण्याचा बहाणा करून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न त्याने केला. त्या गलिच्छ प्रकाराला फिर्यादीने विरोध केला असता तू कोणास सांगितले तर तुला जीवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली.

- Advertisement -

त्यानंतर मंगळवारी रात्री फिर्यादीने या अधिकार्‍याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भादंवि कलम ३७७, ५११, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक आर. एस. शेडगे करीत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -