घरमहाराष्ट्रभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

भरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

Subscribe

मुंबऱ्यातील ३ खाजगी रुग्णालयावर ठाणे महानगर पालिकेकडून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन्ही रुग्णालय कोविड-१९च्या रुग्णांसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

भरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मुंब्र्यातीलत खाजगी रुग्णालयाकडून रुग्नांची आर्थिक लूट केली जात होती. मुंब्र्यातील ३ खाजगी रुग्णालयावर ठाणे महानगर पालिकेकडून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन्ही रुग्णालय कोविड-१९च्या रुग्णांसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय आणि युनिव्हर्सल रुग्णालय असे कारवाई करण्यात आलेल्या मुंब्र्यातील खाजगी रुग्णालयांची नावे आहेत. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या रुग्णालयांमध्ये गरीब आणि आजारी रुग्णांना दाखल करताना, तसेच महिलांना प्रसुतीसाठी दाखल करताना भरमसाठ पैसे भरा असे सांगितले जात होते. तसेच रुग्णालयात बेड शिल्लक असताना देखील प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. सध्या कोविड-१९ चे रुग्ण वाढत असताना रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करुन घेण्याबाबत रुग्णालयांना विनंती करण्यात आली होती तसेच नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु गेल्या दोन दिवसात प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य असल्याचे आढळल्यानंतर या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि सिल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

- Advertisement -


हेही वाचा – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन

- Advertisement -

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेअर रुग्णालय आणि युनिव्हर्सल रुग्णालय विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठामपा उपायुक्त (जनसंपर्क) संदीप माळवी यांनी दिली. तसेच हे तिन्ही रुग्णालय कोविड-१९ रुग्णांसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे माळवी यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -