घरमहाराष्ट्रअंबोली डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी

अंबोली डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी

Subscribe

तालुक्यातील अंंबोली डॅमवर येणार्‍या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढत असून, लोणावळ्याच्या भुशी डॅमपेक्षा पर्यटकांना पोहण्यास सुरक्षित असल्याने अलिकडे पर्यटक या डॅमला विशेष पसंती देताना दिसून येतात.धरणाच्या ओव्हरफ्लो विभागात प्रशस्त जलतरण तलाव असल्यामुळे पोहताना धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. या तलावाची खोली फक्त पाच फूट असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने पर्यटकांना सुरक्षितता अनुभवता येते. पावसाळ्यात वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी आर्वजून येत असतात. हे ठिकाण मुंबई व पुण्यापासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असल्याने एका दिवसात जाणे-येणे पर्यटकांना सोपे होते. गेल्या रविवारी तर दिवसभरात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकपासून जिल्ह्यातील हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती. मुरुड शहरापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर हा डॅम असल्याने पर्यटकाना तेथे आनंद लुटण्यासोबत येथील समुद्र किनार्‍यावर फिरण्याचाही दुहेरी आनंद घेता येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -