घरताज्या घडामोडीया शेतकऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांना गिफ्ट केले किलोभर कांदे

या शेतकऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांना गिफ्ट केले किलोभर कांदे

Subscribe

वर्षाभरापूर्वी कांद्याचे दर कोसळल्याने पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठवल्यामुळे संजय साठे हे शेतकरी चर्चेत आले होते. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या व नावीण्यपूर्ण मार्गाचे अवलंब करणार्‍या संजय साठे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी हा भारत दौरा असणार आहे. सध्या कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. ‘भविष्यात कांद्याची आवक वाढून शेतकर्‍यांचे नुकसान टळावे म्हणून कांदा निर्यात खुली करण्यात यावी’, अशी मागणी निफाड येथील शेतकऱ्याने केली आहे. या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील शेतकरी ‘संजय साठे’ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीस साडी, टोपी-उपरणे तसेच एक किलो कांदे अशी भेट या दौऱ्या निमित्ताने त्यांना पाठवली आहे.

वर्षाभरापूर्वी कांद्याचे दर कोसळल्याने पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठवल्यामुळे संजय साठे हे शेतकरी चर्चेत आले होते. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या व नावीण्यपूर्ण मार्गाचे अवलंब करणार्‍या संजय साठे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचा मराठमोळ्या पद्धतीने सत्कार करण्यासाठी या भेटवस्तू पाठवल्याचा दावा करताना संजय साठे यांनी पत्रात ट्रम्प यांच्यासाठी म्हटले आहे की, ‘या कांद्याचा स्वयंपाकात वापर करून त्याची चव जरूर चाखावी’.

- Advertisement -

या पत्रातून नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे की, ‘शेतमालास भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीचे यांत्रिकीकरण, बियाणे, ठिबकसिंचन, खते आदींसाठी मोठ्याप्रमाणावर अनुदान उपलब्ध करून द्यावे. तसेच ट्रम्प यांच्यासोबत कॉर्पोरेट शेतीवर चर्चा करताना शेतकरी संपणार नाही, याची काळजी घ्यावी. ग्राहक व शेतकरी दोघेही जगतील अशी बाजारभावाची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. याबरोबरच सध्या कांदा बाजारभावाची घसरण सुरूच असून आगामी काळात आवक वाढून कांद्याची आणखी घसरण होणार आहे, तरी कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी साठे यांनी पत्रात केली आहे.

हा कांदा कसा वाटला हे पत्राद्वारे कळवावे असे सांगितले आहे. तसेच संजय साठे यांनी ट्रम्प यांना भारतात फिरताना येथील शेतकर्‍यांचीही भेट घेऊन त्यांच्या अडचणी, समस्या समजून घ्याव्यात अशी विनंती केली आहे. तसेच भारतीय शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपण पंतप्रधान मोदींशी याविषयी चर्चा करावी असे या पत्रातून सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -