घरताज्या घडामोडीबदल्यांचा सपाटा सुरुच; शिर्डी संस्थानावर डोंगरे यांची नियुक्ती

बदल्यांचा सपाटा सुरुच; शिर्डी संस्थानावर डोंगरे यांची नियुक्ती

Subscribe

ठाकरे सरकारने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा शुक्रवारी कायम पहायला मिळाला. यात प्रामुख्याने एकूण पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ए. के. डोंगरे यांची बदली करण्यात आली आहे. डोंगरे हे २००७च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

डोंगरे यांच्या पाठोपाठ इतर अनेकांच्या बदल्या

महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने मंत्रीमंडळ विस्तार पूर्ण केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून या बदल्या करण्यास सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारीही एकूण पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात डोंगरे यांच्या पाठोपाठ इतर अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

लीना बनसोड यांची देखील बदली 

राज्य प्रशासनाने जाहीर केलेल्या या बदल्यांमध्ये २००८ च्या बॅचचे आर.बी.भोसले यांची बदली पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी केली आहे. भोसले हे या अगोदर एम.एस.इलेक्ट्रासिटी वितरण विभागात कार्यरत होते. त्यानंतर त्यांच्याच बॅचचे अभिजीत बांगर यांची नियुक्ती नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर २०१० बॅचचे जी.एम. बोडके यांची नियुक्ती कल्याणच्या एम.एस.इलेक्ट्रिसिटी वितरण कंपनीच्या सह कार्यकारी संचालक पदी करण्यात आली आहे. तर लीना बनसोड यांची नियुक्ती नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. बनसोड या वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य अधिकारी पदावर कार्यरत होत्या.


हेही वाचा – इंदुरीकरांचा व्हिडीओ परवानगीनेच प्रसारित युट्युब चॅनेलवाल्यांचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -