घरताज्या घडामोडीसैराट फेम आकाश ठोसरच्या नावाने केली महिलेची फसवणूक

सैराट फेम आकाश ठोसरच्या नावाने केली महिलेची फसवणूक

Subscribe

या फेक परशाला अहमदनगर सायबर सेलने अटक केली असून त्याकडून एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाला जप्त केला आहे.

चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांचे अनेक फॅन असतात. पण त्यापैकी एखादा जबरा फॅन असतो जो आपल्या आवडत्या अभिनेत्यांसाठी काहीही करू शकतो. जर त्या आवडत्या अभिनेत्याशी थेट संवाद साधायला मिळणार असेल तर त्या जबरा फॅनचा आनंद द्विगुणित होता. मात्र अशाच एका जबरा फॅन असलेल्या महिलेला अभिनेत्याशी संवाद साधण्याच्या मोह महागात पडला आहे.

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यांची ही महिला जबरा फॅन होती. या महिलेचा चार महिन्यापूर्वी आकाश ठोसर यांच्या फेक फेसबुक अकाऊंटशी संपर्क झाला. मग या महिलेची फेक परशासोबत मैत्री वाढली. त्यानंतर तिला या फेक परशाने आर्थिक अडचण असल्याचा बहाण करत मंगळसूत्र आणि एक सोन्याची अंगठी नगर येथून घेतली. मग हे फेसबुक अकाऊंट बंद झाल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड येथील शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज हे फेक अकाऊंट हाताळत होता. महिलेची फसवणूक करणाऱ्या या फेक परशाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी जप्त केली आहे. तसेच एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांनी माहिती दिली आहे.


हेही वाचा – Breaking: कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांना WHO कडून स्थगिती!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -