घरमहाराष्ट्रदिल्लीच्या यशानंतर आप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार

दिल्लीच्या यशानंतर आप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार

Subscribe

महानगरपालिकेच्या निवडणुकीत आप कोणतीही युती किंवा आघाडी करणार नसून आप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय पक्षांना आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तेतून पायउतार व्हावं लागलेल्या भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणारी आप देखील आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार आहे. आप खासदार संजय सिंह यांनी आज मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली.

महानरगपालिकेच्या निवडणुकीत आप कोणतीही युती किंवा आघाडी करणार नसून स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संजय सिंह यांनी जाहीर केले. यावेळी संजय सिंह यांनी आपने दिल्लीत केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला. यामध्ये प्रामुख्याने आपने बदललेल्या सरकारी शाळांचा उल्लेख केला. सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग सुरू करुन खासगी शाळांप्रमाणे त्यांचा दर्जा वाढवला. इतकेच नव्हे तर, आपने सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी परदेश दौरा आयोजित केला होता. याचा फायदा दिल्लीतील सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी झाला, असे संजय सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

CAA कायद्याला आपचा विरोध

खासदार संजय सिंह यांनी CAA कायद्याला विरोध दर्शवत हा कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगितले. यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधांकडून होणाऱ्या टिकेचा त्यांनी समाचार घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -