घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी कस्टडीतून आरोपी फरार

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी कस्टडीतून आरोपी फरार

Subscribe

राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीतून दरोड्यातील दोन सराईत गुन्हेगार असणारे आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.

राजगुरुनगर शहरांमध्ये भीमा नदीवर बांधण्यात आलेला भव्य पूल आणि क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृतीशिल्प यांचा लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत असताना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीतून दरोड्यातील दोन सराईत गुन्हेगार असणारे आरोपी फरार झाले आहेत. राजगुरुनगर शहरात रात्रीपासून पोलीस बंदोबस्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा असल्याने राजगुरुनगर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले असूनही पोलीस कोठडीत असणारे दोन आरोपी फरार झाल्याने पोलीस दला खाली मान घालण्याची वेळ आली आहे.

वाचा : पोलीस झोपले अन आरोपी पळाले

- Advertisement -

आरोपींचा शोध सुरु

राजगुरुनगर येथील कोर्टाच्या मागील बाजूस असणाऱ्या एका इमारतीतून गणेश इंगळे यांची दुचाकी नंबर MH14-FA-8466 बेपत्ता आहे. त्याबाबतची तक्रार राजगुरुनगर पोलिसात दाखल झाली आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस आणि पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र पोलीस कस्टडीत ड्युटीवर असणारे पोलीस यावेळी काय करत होते, त्याबाबत चौकशी होऊन कारवाई होणार का, हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -