घरमहाराष्ट्रडॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

Subscribe

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याने त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली.

या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसर्‍यांदा तर, भावे याने दुसर्‍यांदा अर्ज केला होता. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. शरद कळसकर याला अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -