घरमहाराष्ट्रकर्तव्याचा भाग म्हणूनच मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित; पुरोहितचा दावा

कर्तव्याचा भाग म्हणूनच मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित; पुरोहितचा दावा

Subscribe

प्रसाद पुरोहितचा उच्च न्यायालयात दावा

कर्तव्याचा भाग म्हणून २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित होतो, असा दावा या घटनेतील मुख्य आरोपी ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनी बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. कटासंबंधी झालेल्या बैठकीला मी लष्कर विभागाचा गुप्तहेर म्हणून हजर झालो होतो, अन्यथा माझा या कटाशी काहीही संबंध नसल्याचं पुरोहित यांनी दावा केला आहे. आपल्यावर आवश्यक त्या परवानगीशिवाय आपल्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप करत या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी पुरोहितने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याच्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला इतर आरोपींसोबत पुरोहित उपस्थित होता, असा दावा करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याच्यावर दहशतवादासारखा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, पुरोहित लष्कराने सोपवलेल्या जबाबदारीचा भाग म्हणून बैठकीला उपस्थित होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी एनआयएने आवश्यक ती परवानगी घेणे आवश्यक होते, असा युक्तिवाद पुरोहिततर्फे करण्यात आला.

- Advertisement -

पुरोहितकडून काही माहिती न्यायालयात उपलब्ध करुन दिली. यामध्ये पुरोहितने उपलब्ध केलेल्या माहितीबाबत लष्कराने तसेच माजी आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांनी त्याचे कौतुक केल्याची कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली. कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही आपल्याला तुरुंगात टाकलं गेलं, दहशतवादी असल्याचा ठपका ठेवून छळ करण्यात आली, असा आरोप पुरोहितने केला. दरम्यान, पुरोहितच्या याचिकेला एनआयएने विरोध केला असून भांदवि १९७ नुसार अशा परवानगीची गरज नाही, असा युक्तीवाद एनआयएने केला आहे. यावर पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -