घरमहाराष्ट्रत्या पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी

त्या पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Subscribe

पोलीस कोठडीत असणारे दोन आरोपी खिडकीचे गज कापून पळाले होते. या घटनेनंतर संबधित पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार तर गार्डवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

काल राजगुरुनगर येथील कस्टडीतुन दोन सराईत गुन्हेगारांनी पलायन केल्यानंतर पोलीस दलात खळबळ पसरली होती. पलायन केलेल्या आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे. याप्रकरणी एका गार्ड कमांडरचे निलंबन केले तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून पोलीस कस्टडीत असलेल्या सराईत आरोपीं पसार झाले होते. मध्यरात्रीच्या सुमाराम गंभीर गुन्ह्यातील आरोपी शौचालयाच्या खिडकीचे गज कापून अगदी सहज पसार झाले होते. त्यावेळी गार्ड कंपाडर व पोलीस अधिकारी नक्की कुठे होते? असा प्रश्न उपस्थित झाला होता काल सकाळच्या सुमारास उपविभागिय पोलीस आधिकारी गजानन टोंम्पे,नायब तहसिलदार राजेश कानसकर यांनी घटनास्थळाची पहाणी केली होती.

कस्टडीच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद यांना अनेकदा पत्रव्यवहार केला. संबंधित यंत्रणा फक्त पहाणी करुन जातात मात्र प्रत्येक्षात गरजेच्या उपाययोजना केल्या जात नाही- राजेश कानसकर, नायब तहसिलदार खेड 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -