घरमहाराष्ट्रबेशिस्त वाहनचालकांवर karvae

बेशिस्त वाहनचालकांवर karvae

Subscribe

 ९० हजारांचा दंड वसूल

शहरा व परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. महिनाभरात 300 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलला जात असताना शहर व परिसरात मात्र ही कारवाई थंडावली होती. पुन्हा या कारवाईला सुरूवात झाली आहे. हेल्मेट न घालणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, वाहन वेगाने चालवणे, गणवेश न घालणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, ट्रीपल सीट, दारू पिवून वाहन चालवणार्‍यांवर करवाई केली जात आहे. या कारवाईतून दंडही वसूल केला जात आहे. परंतु वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वाहनांवरून फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. तसेच अनेक रिक्षा स्टँड असून, सुमारे 500 हून अधिक रिक्षा चालक आहेत. परंतु मोजकेच रिक्षाचालक वगळले तर अनेकजण गणवेश घालत नसल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

बाजारपेठ, तसेच बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने लावली जात असल्याने प्रवासी व पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठ आणि रेल्वे स्टेशनबाहेर कशाही रिक्षा लावल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना ये-जा करताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -