जळगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई

जळगाव येथील वाघनगर थांब्यावर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे.

Jalgaon
action on sand mafia in jalgaon
जळगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई

सध्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. जळगावमध्ये आज अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर भील असे या चालकाचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

जळगाव येथील वाघनगर येथे अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टरवर धडक कारवाई करण्यात आली आहे. वाघनगर येथील थांब्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर येणार असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. ज्ञानेश्वर भील हा अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे ट्रॅक्टर अडवून ठेवत तलाठ्यांच्या पथकास माहिती दिली. यानंतर जळगाव शहर तलाठी रमेश वंजारी हे पथकासह दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता ज्ञानेश्वरकडे वाळू वाहतुकीचा परवाना मिळून आला नाही. हे ट्रॅक्टर जप्त करून रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले. ज्ञानेश्वर याच्यासह ट्रॅक्टरमालक सचिन सोनवणे आणि त्याच्या सोबत असलेला सनी आहिरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here