घरमनोरंजनदम मारो दम...ड्रग्स प्रकरणी शौविक, सॅम्युअलला न्यायालयीन कोठडी; दीपेश सावंतलाही अटक

दम मारो दम…ड्रग्स प्रकरणी शौविक, सॅम्युअलला न्यायालयीन कोठडी; दीपेश सावंतलाही अटक

Subscribe

कैझान इब्राहिमची न्यायालयीन कोठडीनंतर जामिनावर सुटका

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासादरम्यान ड्रग्जचा देवाणघेवाणीचा व्यवहार समोर आल्यानंतर शुक्रवारी अटक केलेल्या शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला शनिवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच गुन्ह्यांतील अन्य एक आरोपी कैझान इब्राहिमला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच सुशांतचा नोकर दीपेश सावंतला शनिवारी अटक करण्यात आली. आता त्याला रविवारी कोर्टासमोर उभे केले जाणार आहे.

आत्महत्येच्या तपासानंतर या संपूर्ण प्रकरणात ड्रग्ज लिंक समोर आली होती. त्यानंतर एनसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर त्याचा वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू होता.

- Advertisement -

सुशांतच्या परिचित लोकांकडून ड्रग्जचे देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच एनसीबीने संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. शनिवारी सकाळी कैझान तर रात्री उशिरा रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडा या तिघांना एनसीबीने अटक केली होती. अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी दुपारी बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी दोन तास युक्तिवाद करण्यात आला होता. यावेळी एनबीसीच्यावतीने ड्रग्जचा व्यवहार कशा प्रकारे होत होता, ड्रग्जचे पैसे नक्की कोणाकडून दिले जात होते, ड्रग्ज तस्करीत बॉलिवूड कनेक्शनचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद करून या तिघांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने कैझानला न्यायालयीन तर शौविक व सॅम्युअलला बुधवार 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर या दोघांनाही एनसीबीने ताब्यात घेऊन त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. दुसरीकडे कैझानच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला जामिनावर सोडून दिले. शौविक आणि सॅम्युअलची आता एनसीबीचे अधिकारी समोरासमोर चौकशी करणार आहे. त्यांच्या चौकशीतून येणार्‍या माहितीनंतर संबंधित व्यक्तींची चौकशी होणार आहे. शनिवारी सकाळी सीबीआयने सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घराची पुन्हा पाहणी केली. यापूर्वीही सीबीआयचे पथक सुशांतच्या घरी दोन वेळा गेले होते.

- Advertisement -

मात्र, शनिवारी त्याच्या घरी जाण्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. सुशांतचा कर्मचारी दीपेश सावंत याची एनसीबीने चौकशी केली होती. सकाळी दीपेश हा एनसीबीच्या कार्यालयात आला होता. या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव समोर येत असल्याने तिला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे. तिची चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास एनसीबीने नकार दिला. लोकल कोर्टात हजर करण्यापूर्वी या शौविक आणि सॅम्युअलला शीव येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

वांद्य्रातल्या सुशांतच्या घरात पुन्हा क्राईम सीन रिक्रिएट
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची टीम या केसमधील प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पैलूचा तपास करत आहे. सीबीआयची टीम शनिवारी सुशांतच्या वांद्रे येथील घरी तपासासाठी पोहचली होती. या टीमसोबतच सिद्धार्थ पिठानी, केशव आणि नीरज या तिघांचाही समावेश होता. त्यासोबतच सुशांतची बहीण मीतू सिंह हीदेखील शनिवारी वांद्रे येथील घरी पोहचली होती. शनिवारी या संपूर्ण प्रकरणातला क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. मृत्यूच्या वेळी घरात उपस्थित व्यक्तींसोबतच एम्स हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांची टीम या प्रकरणातील तपासासाठी या ठिकाणी हजर होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -