घरमहाराष्ट्रअधिवेशनात या दिवशी मांडला जाणार अर्थसंकल्प

अधिवेशनात या दिवशी मांडला जाणार अर्थसंकल्प

Subscribe

महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून १७ जून ते २ जूलै या कालावधीत हे अधिवेशन चालणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असून त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे.

मंगळवार दिनांक १८ जुन रोजी सकाळच्या सत्रात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पटलावर मांडला जाणार आहे. बुधवार आणि गुरूवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होऊन, गुरूवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल. शुक्रवारी अशासकीय कामकाज अर्थातच ठराव मांडले जाऊन शनिवार व रविवारच्या सुटीनंतर सोमवार दिनांक २४ आणि मंगळवार दिनांक २५ रोजी अर्थसंकल्पावर अनुक्रमे चर्चा व मतदान होईल. बुधवारीही अर्थसंकल्पावर चर्चा होऊन शुक्रवार व शनिवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.

- Advertisement -

लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काही तरतुदी आणि घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. दुष्काळासह, मंत्र्यांच्या घोटाळ्यासंदर्भातही या विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -