घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंना लग्नाविषयी विचारल्यावर म्हणाले, दिशा...

आदित्य ठाकरेंना लग्नाविषयी विचारल्यावर म्हणाले, दिशा…

Subscribe

लग्नाविषयी आई ठरवणार?, असे विचारले असता आदित्य ठाकरे यांनी आईचा नंबर ऑफ लाईन, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेत असते. नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी देते. मात्र, आता रश्मी ताईंनी ही जबाबदारी अजून कधीपर्यंत घ्याची?’, असा प्रश्न अवदूत गुप्ते यांनी मेधा महोत्सवात पर्यावरणमंत्री यांच्यासमोर उपस्थित केल्यास त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘तुमची दिशा चुकली आहे’, असे म्हटल्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर आदित्य असे, देखील म्हणाले की, ‘आईने जबाबदारी सोडली आहे, कारण मला राजकारणात जाऊ नको, असे सांगितले होते. मात्र, तरीही मी राजकारणात आलो आहे. तसेच आई म्हणाली की, मला तू विचारलंस का राजकारणात जाऊ का? त्यावर मी आईला विचारलं की, तुच तर माझा फॉर्म भरला होताना. त्यावर म्हणाली ‘अरे हो पण लढू का?, असे तू विचारलेस का?’, असं म्हटल्यावर अवधूत गुप्ते यांनी विचारले, की याचा अर्थ आई ठरवणार हे ठरले आहे? यावर ‘पुढचं अजून ठरले नाही’ असे म्हणत एकच हशा झाला.

आईचा नंबर ऑफ लाईन

दरम्यान, धीरज देशमुख यांनी म्हटले की, याचा अर्थ आदित्य ठाकरे Available आहेत. त्यामुळे कोणाला संपर्क साधायचा असल्यास अवधूत गुप्तेंकडे रश्मी ठाकरेंचा नंबर आहे. त्यावर आईचा नंबर ऑफ लाईन आहे, असे देखील आदित्य ठाकरे सांगितले.

- Advertisement -

मेधा सांस्कृतिक महोत्सव

युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये मेधा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आज, युवा आमदारांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार झिशान सिद्दीकी या राजकारणातील तरुण पिढीची मुलाखत गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी ते असे देखील म्हणाले की, ‘आमची युवापिढी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गोष्टींचा आम्ही विकास करु, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – ‘राजकारणात टिकणार की नाही हे जनतेच्या हातात’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -