घरमहाराष्ट्रसामाजिक जीवनात आदिवासीना योग्य स्थान नाही - मेघनाथ कुमार

सामाजिक जीवनात आदिवासीना योग्य स्थान नाही – मेघनाथ कुमार

Subscribe

सिनेमासारख्या समाज माध्यमाने नेहमीच आदिवासीचे चुकीचे चित्रण करत जंगलात राहणारे, ठराविक पेहेराव असलेले आणि नृत्य करणारे असेच त्यांचे चित्रण केले असल्याची खंतरीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ कुमार यांनी व्यक्त केले.

देशाच्या जडणघडणीत आणि विकासात आदिवासी समाजाने कायमच मोलाचे योगदान दिले आहर सामाजिक जीवनात आदिवासीना योग्य स्थान मिळालेले नाही. सिनेमासारख्या समाज माध्यमाने नेहमीच आदिवासीचे चुकीचे चित्रण करत जंगलात राहणारे, ठराविक पेहेराव असलेले आणि नृत्य करणारे असेच त्यांचे चित्रण केले असल्याची खंतरीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ कुमार यांनी व्यक्त केले. ते अंकुर फेस्टीवलच्या समारोपप्रसंगी बोलत होते. गेल्या चार दिवसांपासून अभिव्यक्ति मिडीया फॉर डेव्हलपमेंट,नाशिक यांच्याकडून ७ व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात करले होते. यावेळी मेघनाथ कुमार यांच्या प्रसिद्ध फिल्म लोहा गरम है, गाव छोडाब नहीं , गाडी लोहार दाब मेल, सृष्टी कथाचे सादरीकरण करण्यात आले.

समारोपही वेगळ्या पद्धतीने

अंकुरच्या उद्घाटनाप्रमाणेच समारोपही वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी फिल्ममेकिंगचे चिन्ह असलेले ‘रील’ अभिव्यक्तीची संवाद माध्यमे आणि प्रेक्षक यांच्याकडून फिल्म यांना सुपूर्त करण्यात आले. यातून फेस्टीव्हलच्या माध्यमातून संवाद प्रक्रिया पूर्ण झाली असे दर्शविण्यात आले.

- Advertisement -

चांगली फिल्म बघतांना एडीटरची आठवण येत नाही : प्रशांत नाईक

अनेकदा फिल्म बघितल्यानंतर प्रेक्षक एडीटींगवर बोलतांना दिसतात. ही गोष्टी विडीओ एडीटरने काम चोख केलेले नसल्याचे लक्षण आहे. कारण संपूर्ण शुटींग पाहिल्यानंतरच ‘एडीटींग’ चांगले झाले की नाही ते ठरवता येते असे मत राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्ाईक यांनी ‘एडीटींग’ या विषयावर झालेल्या कार्यशाळेत व्यक्त केले आहे. अंकुर फस्टीवलच्या समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली.

एडीटींग हा महत्वाचाटप्पा

फिल्ममेकिंगमध्ये एडीटींग हा महत्वाचा टप्पा असतो. एखाद्या व्यक्तीला एडीटींग आले असता तो चांगला फिल्ममेकर बनू शकतो. कारण यामध्ये फिल्मला दुसऱ्यादा डायरेक्ट करण्याचे काम असते असे नाईक यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या फिल्मस् दाखवून त्यांनी जगातला एडीटींगचा संपूर्ण प्रवास अभ्यासकांना उलगडून सांगितला.

- Advertisement -

कार्यक्रमात हे चित्रपट दाखवण्यात आले

फेस्टीव्हलच्या समारोपाच्या दिवशी आई आणि मुलगा यांच्यातील प्रेमावर आधारीत मा हा लघुपट दाखवण्यात आला. बॉम्बे बांबू और बीएमसीही मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची कथा, स्वामिनी दारू बंदी , हाये इराणी, अन फॉर्च्युनेट फ्लाईट, सिग्नल रेड, अ स्ट्रीट इन युर सेन्स , व्हिडियो गल्ली, द सिनेमा ट्रॅव्हलर, बिस्मार घर, इन जर्णी, गॉडेस इन मास्क , सिंधुर, व्हिलेज कम्युनिटी पर्वस वे फॉरेस्ट कॉन्सरवेशन, नाची से बांची दाखवण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -