घरट्रेंडिंगगर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मली देशातील पहिली मुलगी

गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मली देशातील पहिली मुलगी

Subscribe

डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने सिझेरिअनच्या माध्यमातून ही ऐतिहासिक प्रसुती केली. यानिमित्ताने भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे.

गुरुवारी (आज) पहाटे पुण्यामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. आज पुण्यामध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेतून देशातील पहिली कन्या जन्माला आली. गर्भाशय प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयामध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून १२ मिनीटांनी या गोंडस मुलीचा जन्म झाला. तिचे वजन १४५० ग्रॅम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने सिझेरिअनच्या माध्यमातून ही ऐतिहासिक प्रसुती केली. यानिमित्ताने भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे.

गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मलेलं देशातील पहिलं गोंडस बाळ (सौजन्य-सोशल मीडिया)

कधी झाले प्रत्यारोपण?

भारतातील हे पहिले गर्भाशय प्रत्यारोपण १८ मे २०१७ रोजी गुजरामध्ये करण्यात आले होते. वडोदरा येथील एका महिलेला तिच्या ५२ वर्षीय आईने गर्भाशय दान केले होते. या महिलेवर गेल्या ७ महिन्यांपासून विशेष देखरेखीखाली उपचार केले जात होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा रक्तदाब वाढल्याने सिझेरियनद्वारे तिची प्रकृती करण्यात आली. दरम्यान सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून, त्या महिलेच्या कुटुंबियांसह डॉक्टरांची संपूर्ण टीमही खूप खुश आहे. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या गर्भाशयातून जन्मलेलं हे देशातील पहिलं बाळ ठरलं आहे.


लज्जास्पद: विवाहित महिलेवर घरात घुसून बलात्कार
वाचा: मूकबधीर महिलेचा ४ जवानांवर बलात्काराचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -