घरताज्या घडामोडीतब्बल पाच महिन्यांनंतर एसटीची आजपासून आंतरराज्य बससेवा सुरू होणार

तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीची आजपासून आंतरराज्य बससेवा सुरू होणार

Subscribe

या प्रवासादरम्यान एका सीटवर एकच प्रवाशाला प्रवास करता येणार आहे.

कोरोनाचा विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटीची बससेवा २३ मार्चपासून ठप्प झाली होती. तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर आजपासून एसटीची आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. एसटीची आंतर जिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता एसटी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणार आहे.

महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरुवातीला सुरू होत आहे. तसेच आजपासून धुळे विभागातून धुळे-सुरत, दोंडाईचा-सुरत, शिरपूर-सुरत अशी आंतरराज्य बससेवा देखील सुरू होत आहे. याकरिता एसटीच्या धुळे विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या प्रवासादरम्यान एका सीटवर एकच प्रवाशाला प्रवास करता येणार आहे. याप्रमाणे एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बसमध्ये बसल्यानंतर देखील मास्क घालणे आवश्यक राहणार आहे. प्रवाशांचा मिळणार प्रतिसाद या आधारावर टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, मध्यप्रदेशसाठी देखील एसटीची आंतरराज्य बससेवा सुरू होणार आहे. त्यानंतर हळूहळू सर्वच मार्गांवर एसटीची सेवा सुरू होणार आहे.

दरम्यान राज्यशासनात एसटी महामंडळाचे विलनीकरण करावे अशी मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर एसटीच्या २० संघटना मिळून तयार झालेल्या कृती समितीची बैठक पार पडली. या कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत या मागणीसंदर्भात एकमत झाले. पुण्यात झालेल्या कृती समितीच्या पहिल्या बैठकीचा मुख्य हेतू एसटीचे राज्यशासनात विलनीकरण हाच होता आणि त्यावर आता एकमत झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हॉटेल व्यवसाय बंदचा एसटीला ४० कोटींचा फटका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -