घरCORONA UPDATEलॉकडाऊननंतर श्वसन विकाराचे संकट ओढावू शकते, आवाज फाऊंडेशनचा निष्कर्ष

लॉकडाऊननंतर श्वसन विकाराचे संकट ओढावू शकते, आवाज फाऊंडेशनचा निष्कर्ष

Subscribe

मुंबईतले लॉकडाऊन हटवल्यानंतर शहरात श्वसनाच्या विकारात वाढू होऊ शकते असा अंदाज आवाज फाऊंडेशनने लॉकडाऊनच्या काळातल्या नोंदीच्या आधारावर वर्तवला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्या पीएम २.५ मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पीएम २.५ च्या वाढत्या परिणामामुळे मानवी शरीरात घातक असे प्रदुषण श्वसनाच्या विकारासाठी कारणीभूत ठरू शकते असा अंदाज या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात एका हॅण्डहेल्ड उपकरणाचा वापर करून आवाज फाऊंडेशनने हवेतील प्रदुषण ट्रॅक केले. याआधी गोळा केलेल्या डेटानुसार १ जानेवारीला १२० एमजी प्रति एम क्युब इतकी नोंद झाली होती. तर भिवंडीच्या रस्त्यानजीकच्या डम्प यार्डच्या ठिकाणी ६२१ एमजी प्रति एम क्युबची नोंद झाली होती. शहरी भागात सरासरी प्रमाण हे लॉकडाऊनच्या आधी ४५ एमजी प्रति एमक्युब इतके होते. तर लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण २७.८ एमजी प्रति एमक्युब इतके पहिल्या लॉकडाऊनमुळे खाली आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये २३.३ एमजी प्रति क्युब, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये २२.६ एमजी प्रति क्युब, तर चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण २७.५ एमजी प्रति क्युब असे होते.

- Advertisement -

लॉकडाऊन नंतर हवा प्रदुषित करणाऱ्या या घटकांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी भागात श्वसनाचे विकार वाढतील. म्हणूनच वेळीच या घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुल्लाली यांनी व्यक्त केले आहे. कोव्हिड १९ सारख्या लढाईत हे वातावरण आणखी प्रदुषित करू शकतात. त्यामुळे श्वसनाच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच योग्य वेळीच शहरासाठीची खबरदारी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -