घरमहाराष्ट्र५८ मुकमोर्चांनंतर मराठा समाजाची 'संवाद यात्रे'ला सुरुवात

५८ मुकमोर्चांनंतर मराठा समाजाची ‘संवाद यात्रे’ला सुरुवात

Subscribe

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात स्थान मिळाल्याशिवाय आणि इतर मागण्याची पूर्तता झाल्याशिवाय मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा या 'संवाद यात्रे'च्या समन्वयकांनी दिला.

मराठा समाजाने आतापर्यंत ५८ शांततापूर्वक मोर्चे काढले आहेत. या मोर्चांमध्ये लाखो मराठे एकत्र आले होते. परंतु, तरीही आपल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने मराठा समाजाने आता ‘संवाद यात्रे’ला सुरुवात केली आहे. आज पुण्याच्या राजगुरुनगर येथे ही ‘संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात स्थान मिळाल्याशिवाय आणि इतर मागण्याची पूर्तता झाल्याशिवाय मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा या ‘संवाद यात्रे’च्या समन्वयकांनी दिला. खेड बाजार समिती आवारात फटाके वाजवून आणि घोषणा देऊन ‘संवाद यात्रे’चे स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘संवाद यात्रे’तील समन्वयकांनी राजगुरुनगर येथील सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. वामन बाजारे, सुदाम कराळे, एल. बी. तनपुरे, शंकर राक्षे, अंकुश राक्षे, अॅड. अनिल राक्षे, मच्छिंद्र राक्षे, शुभम घाडगे, दिलीप होले, शिवाजी गव्हाणे, बाळासाहेब सांडभोर, कैलास दुधाळे, कैलास मुसळे, साहेबराव थिगळे, दत्ता शितोळे आदींनी मराठा ‘संवाद यात्रे’तील समन्वयकांचे स्वागत केले.

हेही वाचा – मराठा क्रांती मोर्चा : सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा

- Advertisement -

‘हे’ आहेत ‘संवाद यात्रे’चे उद्देश

मराठा समाजाने शांततेने ५८ मोर्चे काढले. आता गाव स्तरावर आणि सर्वसामान्यांना मोर्चाची भूमिका कळावी या उद्देशाने मराठा ‘संवाद यात्रा’ सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता जनजागृती करून २६ नोव्हेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या ‘संवाद यात्रे’च्या समन्वयकांनी मोर्चाची भूमिका विषद केली. मराठा आरक्षणाची घोषणा करून या समाजाने जल्लोष करावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी आमची फक्त आरक्षणाची मागणी नसून उर्वरीत मागण्यांबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत. आंदोलनादरम्यान आमच्या ४८ जणांनी बलिदान दिले. त्याचे काय? कोपर्डी प्रकरणावर न्याय मिळाला का?आंदोलाकांवरील गुन्हे आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. हे आंदोलन पुर्ण मागण्या मान्य झाल्यावरच थांबेल असं समन्वयकांनी सांगितले आहे.


हेही वाचा – सकल मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण अखेर मागे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -