घरमहाराष्ट्र'मराठा समाजाला दगा फटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल'; खासदार संभाजीराजेंनी सुनावले

‘मराठा समाजाला दगा फटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल’; खासदार संभाजीराजेंनी सुनावले

Subscribe

मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती दिली असून याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर नाराजी दर्शवली आहे. त्यांनी यासाठी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले असून तत्कालिन युती सरकार तसेच आताचे महाविकास आघाडी सरकार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना गृहीत धरून दगा फटका केल्यास जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती

मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल.
यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

‘कंगनाने मुंबईत येऊन शिवसेनेचं नाक कापलं’, राणेंचा हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -