घरमहाराष्ट्रआगरी महोत्सव समाजापुरता मर्यादित नाही - गुलाब वझे

आगरी महोत्सव समाजापुरता मर्यादित नाही – गुलाब वझे

Subscribe

आगरी युथ फोरम डोंबिवली आयोजित आगरी महोत्सव एक वेगळ्या वळणावर चालला आहे. सर्वांना समाविष्ट करणारा महोत्सव असून त्याची व्याप्ती वाढली आहे. येत्या रविवारी डोंबिवलीमध्ये या महोत्सावा सुरुवात होणार आहे.

आगरी युथ फोरम डोंबिवली आयोजित आगरी महोत्सव एक वेगळ्या वळणावर चालला आहे. सर्वांना समाविष्ट करणारा महोत्सव असून त्याची व्याप्ती वाढली आहे. समाजाबरोबर इतर जातीही या महोत्सवाची वाट पहात असतात. आगरी समाजातील लाखो लोकांच महोत्सवाला सहकार्य मिळत असून आता शीख, मुस्लिम, जैन समाजही महोत्सवाकडे डोळे लाऊन पहात आहे. त्यामुळे आगरी महोत्सव आगरी समजापुरता मर्यादित राहिलेला नाही असे वक्तव्य फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केले.

येत्या रविवारी होणार उद्घाटन

पूर्वेकडील सुरभी हॉल येथे आयोजित १६ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत वझे बोलत होते. आगरी महोत्सवाचे उद्घाटन रविवार, ९ डिसेंबर रोजी होत असून खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सायंकाळी ६.३० वाजता पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पु. ल. व्यक्तीमत्वाचा शोध या विषयावर होणाऱ्या परिसंवादात साहित्यिक श्याम भुर्के, डॉ. प्रकाश पायगुडे सुरेश देशपांडे सहभागी होणार आहेत. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भजनसंध्या कार्यक्रमात महादेवबुवा शहावाजकर, शंकुबुवा पडघेकर, अनंतबुवा भोईर, नंदकुमार पाटील आदी भजनसम्राट सहभागी होणार आहेत. सव्वासात वाजता आगरी समाज आणि अध्यात्म या विषयावर मान्यवर ह. भ. प. महाराजांचे चर्चासत्र होणार आहे.

- Advertisement -

विविध कार्यक्रमांचे आयोजन 

१२ डिसेंबर रोजी आरोग्य विषयक शासनाचे विविध उपक्रम या चर्चासत्रात डॉ. संजय ओक, डॉ. मुकुंद तायडे, डॉ. संजय सुरासे, डॉ. प्रवीण बांगर, डॉ. गुरुनाथ खानोलकर, डॉ. दिनेश म्हात्रे सहभागी होणार आहेत. १३ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाची भविष्यातील वाटचाल एक दृष्टीझेप या विषयावर मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्रचंद्र, डॉ. अशोक महाजन, डॉ. सुरेश उकरांडे, डॉ. अजय भामरे सहभागी होणार आहेत. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिला विशेष दिन म्हणून गाथा स्त्री शक्तीची विषयावर व्याख्यान सहभाग माधवी घारपुरे, दिपाली काळे, वृषाली पाटील, रेखा पुणेतांबेकर, प्राची गडकरी तर १५ डिसेंबर रोजी कायदा आणि सुव्यवस्था चर्चासत्रात पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, प्रताप दिघावकर, रविंद्र शिसवे, संजय शिंदे आणि कायदेतज्ञ अॅड शिवराम गायकर सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता होणार आहे.

कारण नसताना विरोधाची भाषा करतात याचं दुख

वझे म्हणाले की, आगरी युथ फोरम रजिस्टर संस्था असून संस्थेचा हिशोब परिपूर्ण आहे. शहरात पार पडलेल्या दर्जेदार साहित्य संमेलन, नाट्य संमेलनात आगरी युथ फोरमने महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल आगरी समाजाला अभिमान आहे. काही दहा-पंधरा कारण नसताना विरोधाची भाषा करतात याचं दुख होत आहे. २७ गावांची वेगळी नगरपालिका व्हावी, रजिस्ट्रेशन, रस्ते, पाणी अशा विषयांवरही फोरम वेळोवेळी आवाज उठवत असते. पण आगरी महोत्सव हे महोत्सवाचे व्यासपीठ असल्यामुळे काही मर्यादा येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -