घरमहाराष्ट्रकल्याणमध्ये रंगले अहिराणी साहित्य संमेलन

कल्याणमध्ये रंगले अहिराणी साहित्य संमेलन

Subscribe

कल्याण येथे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.

अहिराणी भाषेला एक वेगळा असा इतिहास आहे. या भाषेतील मौखिक साहित्य हे खऱ्या अर्थाने सोन्याची खाण आहे. त्यामुळे या भाषेचं जतन आणि संवर्धन व्हावं, या दृष्टीकोनाने खान्देश हित संग्राम आणि खान्देश साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण शहरातील चिकणघर येथील मंगेशी बँक्केट हॉल येथे रविवारी अहिरानी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन खान्देश हित संग्राम संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कवी सुनील गायकवाड हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर कवी सदाशिव सुर्यवंशी हे या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. अत्यंत हसतखेळत हे संमेलन पार पडले. या संमेलनाला प्रेक्षकांची तुफा गर्दी जमली होती. या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक एस. के. पाटील, देविदास हटकर, मोहनदास भामरे, सुरेश पाटील, सुनीताताई पाटील, कैलास पाटील, उमेश बोरगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन प्रविण माळी तर दुसऱ्या सत्राचे सुत्रसंचालन रमेश धनगर यांनी केलं.

खान्देश हिरा आणि हिरकणी पुरस्कार प्रधान

या संमेलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांना खान्देशना हिरा आणि ज्येष्ठ लेखिका लतिका चौधरी यांना खान्देशनी हिरकरण हे पुरस्कार प्रधान करण्यात आले. सुदाम महाजन यांचे पाणी फाउंडेशन क्षेत्रात फार मोठं योगदान आहे, तर लतिका चौधरी यांचे अहिराणी साहित्य क्षेत्रात मौल्यवान असे योगदान आहे.

- Advertisement -

व्यसन सोडण्याचं संदेश देणारं अहिराणी भारुड

या संमेलनाला मोहन पाटील आणि त्यांच्या टीमने अहिराणी भारुड सादर केलं. या भारुडच्या माध्यमातून व्यसन सोडण्याचा संदेश देण्यात आला. या भारुडने सर्वांचे मन जिकलं. मोहन पाटील यांच्या टीमचं याठिकाणी सर्व ज्येष्ठ साहित्यिकांकडून यावेळी कौतुक करण्यात आलं.

कवी संमेलनामुळे प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

कवी संमेलनाने प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध केलं. या संमेलनात एकापेक्षा एक कविता सादर करण्यात आल्या. प्रा. सदाशिव सुर्यवंशी यांनी या कवीसंमलानाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सुनिता पाटील, शरद धनगर, रमेश धनगर, रमेश बोरसे, गणेश पाटील, ड‌ॉ. एस.के.पाटील, रमेश राठोड, हेमलता पाटील, विजय माळी, तुषार पाटील, भटू जगदेव, मिलिंद जाधव या कवींनी कविता सादर केली.

- Advertisement -

पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर नाटक सादर

खान्देशात पाणी हा ज्वलंत विषय आहे. पाणी समस्येवर जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनाने ‘जवय आसू सरतर’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, अशी माहिती या नाटकाचे लेखक आणि कलाकार जगदीश पाटील यांनी दिली. या नाटकाने प्रेक्षकांची डोळे पानावले. खान्देशातील रखडलेल्या धरण प्रकल्पाचा उल्लेख या नाटकात करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -