घरमहाराष्ट्रनाशिकहून अहमदाबादला जाणारी विमानसेवा रद्द

नाशिकहून अहमदाबादला जाणारी विमानसेवा रद्द

Subscribe

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नाशिकहून अहमदाबादला जाणारी विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नाशिकहून अहमदाबादाला जाणाऱ्या विमानसेवेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली. अचानक विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आहे. गेल्या चार तासांपासून विमानतळावर विमानाची वाट पाहिल्यानंतर नाशिकहून अहमदाबादला जाणारी विमानसेवा रद्द करण्यात आल्याचा मेसेज विमानतळ प्रशासनाने दिल्याने नाशिक प्रवाशांचा संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. विमानतळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे चार तास विमानाची वाट पाहावी लागल्याने प्रवाशांना आज नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

प्रवाशांना मनस्ताप

ट्रुजेट कंपनीच्या वतीने उड्डान योजनेअंतर्गत नाशिक – अहमदाबाद ही विमान सेवा दिली जात असून याला सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठा प्रतिसाद आहे. मात्र अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवास रद्द होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बरेच प्रवासी दुपारपासून ओझर विमानतळावर आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान येत नसल्याने प्रवासी वैतागले होते. अखेर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कंपनीने प्रवाशांना माहिती दिली आणि तांत्रिक कारणास्तव सेवा रद्द झाल्याचे सांगितले. तसेच सोमवारपासून नियमित सेवा मिळेल, अशी घोषणा देखील या कंपनीने केली. मात्र चार तास ताटकळत असलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -