घरमहाराष्ट्रअहमदनगरमधील भाजप नेत्याचा पुतण्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

अहमदनगरमधील भाजप नेत्याचा पुतण्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता एकमेकांच्या पक्षातील नेत्यांची पळवापळवी सुरु झाली आहे. पुन्हा एकदा पुतण्याचे राजकारण अहमदनगर जिल्ह्यात होत आहे.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता अहमदनगरचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सुजय विखे पाटील यांना भाजपमध्ये नेण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्या शिवाजी कर्डिले यांचा पुतण्या रोहिदास कर्डिले यांना राष्ट्रवादीने पक्षप्रवेश देण्याची तयारी सुरु केली आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

हे वाचा – …तरच भाजपला बारामती जिंकता येईल; जयंत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला

कोण आहेत रोहिदास कर्डिले

बाणेश्वर दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले हे राहुरी मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे आहेत. अहमदनगर शहरात त्यांचे प्राबल्य असून दक्षिण अहमदनगर लोकसभेसाठी ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करु शकतात. भाजपने सुजय विखे यांना पक्षात घेऊन लोकसभेचे तिकिट देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीतूनही या मतदारसंघात आक्रमक व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून थेट शिवाजी कर्डिले यांच्या पुतण्यालाच पक्षप्रवेश देण्यात येत आहे.

rohidas kardile
रोहिदास कर्डिले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -