घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये थोरातांना धक्का; काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अहमदनगरमध्ये थोरातांना धक्का; काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Subscribe

समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरांना धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र पक्ष सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भुमिकेमुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना चांगलाच झटका बसला आहे. उद्या नगरच्या संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे. या सभेच्या आदल्या दिवशीच अहमनदनगरमध्ये राजकारण तापलेले पहायला मिळत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नाही, असे वक्तव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज झाले होते. त्यामुळे करण ससाणे यांनी आमचे समर्थक भाऊसाहेब कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका त्यांनी याआधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

पुर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष आहेत. करण ससाणे यांनी राजीनामा दिल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -