घरताज्या घडामोडीकोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्याना जन्म

कोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्याना जन्म

Subscribe

कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

एका कोरोनाबाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात या महिलेने एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला असून बाळांची आणि आईची प्रकृती व्यवस्थित असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

आईसह बाळांची प्रकृती व्यवस्थित

मुंबई येथून ही गर्भवती महिला अहमदनगर येथे गेली होती. दरम्यान, नगरमध्ये दाखल झाल्यानंतर या महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यावेळी या महिलेचा २५ मे रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या महिलेवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. दरम्यान, आज या महिलेची प्रसूती झाली असून या कोरोनाबाधित महिलेने एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला आहे. तसेच दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके असून त्यांच्या आईसह मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या दोन्ही मुलांची सुद्धा करोना अनुषंगाने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात २५९८ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात राज्यात २ हजार ५९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. त्यापैकी १८ हजार ६१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरात ६९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजघडीला राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार ९३९ इतकी आहे. त्याशिवाय, आज दिवसभरात राज्यात ८५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची राज्यातली एकूण संख्या १९८२ इतकी झाली आहे.


हेही वाचा – महापालिकेमार्फत नागरिकांना मिळणार होमिओपॅथी औषध

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -