घरमहाराष्ट्रअजित पवार आणि धनंजय मुंडेचा फिटनेस; ६ किमी नाईट वॉक

अजित पवार आणि धनंजय मुंडेचा फिटनेस; ६ किमी नाईट वॉक

Subscribe

राजकारणी म्हणजे महागड्या गाड्यातूनच फिरत असतील, अशी सामान्य जनतेची समजूत असते. मात्र स्वतःच्या फिटनेससाठी आणि लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधी देखील पायी फिरत असतात. सध्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रायगड येथे परिवर्तन यात्रेची सभा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करत मुक्कामस्थळ गाठले. फिटनेससाठी रोजच एवढा वॉक करण्याची दोन्ही नेत्यांना सवय आहे. मात्र या वॉकदरम्यान त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मात्र भर थंडीत चांगलाच घाम निघाला.

“लोकांची काम करत असताना स्वतः तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालण्याचा प्रयत्न करतो” असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसोबत नाईट वॉक करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.

- Advertisement -

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा नाईट वॉक | Ajit Pawar and Dhananjay Munde night walk at Raigad

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सध्या निर्धार परिवर्तन यात्रेसाठी दौऱ्यावर आहेत. काल रात्री सभा संपल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सहा किमींचा नाईट वॉक केला.

Posted by My Mahanagar on Thursday, January 10, 2019

काल रायगड येथे शिवरायांना मानवंदना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा सुरू झाली. रायगडावर या टोकावरून त्या टोकावर पायपीट करून दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तब्बल सहा किलोमीटरचा नाईट वॉक दोन्ही नेत्यांनी केला.

- Advertisement -

कंधो से मिलते हैं कंधे!

दिवसभर काम करून अजित पवार मोठ्या तडफेने चालत होते. अजित पवार यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनाही धाप लागत होती. पण विविध विषयांवर चर्चा करत पवार झपाझप अंतर कापत होते. धनंजय मुंडे मात्र कंधो से मिलते है कंधे… असे म्हणत अजित पवार यांची साथ देताना दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -