घरमहाराष्ट्रअजित पवार आणि पार्थ एकाच व्यासपीठावर; राजकारणात एंट्री होणार?

अजित पवार आणि पार्थ एकाच व्यासपीठावर; राजकारणात एंट्री होणार?

Subscribe

पार्थ पवार यांच्या राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीकडून पेरणी सुरु झाली आहे. आधी शरद पवार यांच्यासोबत दौरा केल्यानंतर आता पार्थ अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपिठावर दिसले.

सांगवी येथील झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या सोबत पार्थ पवार हे दिसले आहेत.त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी अजित पवार आणि पार्थ पवार हे एकाच व्यासपीठावर होते. निमित्त होतं ते सांगवी मधील जॉब फेअर कार्यक्रमाचे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुलगा पार्थ पवारसह अनेक राष्ट्रवादीचे मान्यवर देखील उपस्थित होते.

अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यावर अनेकवेळा अजित पवार यांनी बोलण्यास टाळले होते. परंतु आज स्वतः अजित पवार यांच्या सोबत पार्थ पवार एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांची एन्ट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -
थोरल्या पवारांचा पार्थच्या उमेदवारीला नकार? अजित पवारांचं मात्र सूचक वक्तव्य!

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांची राजकीय क्षेत्रात मावळ मधून पदार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु त्यावर अजित पवार यांनी वारंवार यावर बोलण्यास टाळले. पार्थ पवार हे अनेक कार्यक्रमाला देखील उपस्थिती लावत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले असून त्यावर पार्थ पवार यांचे फोटो झळकत आहेत. या सर्व घडामोडीमुळे विरोधकांना मात्र धडकी भरत आहे.

शरद पवार यांच्यासोबत केला होता कोकण दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या तीन नातूंनी काही दिवसांपूर्वी कोकण दौरा केला होता. पार्थ अजित पवार, रोहित राजेंद्र पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार असे हे तीन नातू २४ तास आपल्या आजोबांसोबत दिसून आले होते. यापैकी रोहित पवार हा आधीच राजकारणात आला असून तो पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य आहे. पार्थ पवार मावळमधून लोकसभा लढवू शकतो? अशी बातमी मध्यतंरी आली होती. या बातमीला पवार कुटुंबियांकडून जरी अधिकृत दुजोरा दिला गेला नसला तरी पार्थ राजकारणात येण्याआधी संघटनेत सक्रीय झालेला पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

वाचा : हिरे व्यापारी हत्या: ‘गोपी बहू’ मालिकेतील अभिनेत्रीचे नाव रडारवर

parth pawar with grandfather sharad pawar
शरद पवार यांच्यासोबत त्यांचे तीनही नातू (पार्थ, रोहित, श्रीनिवास)

वाचा : हिरे व्यापारी हत्या: ‘गोपी बहू’ मालिकेतील अभिनेत्रीचे नाव रडारवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -