घरमहाराष्ट्रपंढरपूरातून पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत अजितदादांचा मोठा खुलासा

पंढरपूरातून पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत अजितदादांचा मोठा खुलासा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पंढरपूरच्या विकासासाठी विधानसभा पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खुलासा करत पार्थच्या उमेदवारीच्या चर्चेवर अजितदादांनी सोमवारी महत्वाची माहिती जाहीर केली. भारत भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासहीअजित पवार यांनी व्यक्त केला.

पोटनिवडणुकीत उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -