घरमहाराष्ट्रअजित पवार-गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा; बारामती जिंकणार कोण?

अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा; बारामती जिंकणार कोण?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीच्या निमित्ताने पक्षाचे आमदार अजित पवार आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये बारामती जिंकण्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे.

निवडणुका जवळ आल्या म्हणजे राजकीय सुंदोपसुंदी, आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हानं असं सगळं काही होणारच अशी सवय आता जनतेलाही एव्हाना झाली असावी. आणि तीच सवय मोडू नये याची पुरेपूर काळजी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची नेतेमंडळी घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यभर परिवर्त रॅली सुरू असून ही रॅली जळगावात असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना उघड आव्हान दिलं. आणि तेही बारामतीमध्ये येऊन निवडणूक जिंकण्याचं! त्याला कारणही तसंच होतं. गिरीश महाजनांनीच बारामतीत निवडणूक जिंकण्याचं विधान केलं होतं. त्यामुळे आता बारामतीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय सुंदोपसुंदी म्हणा किंवा आव्हान-प्रतिआव्हानाचा आखाडा रंगताना दिसू लागला आहे!

उचलली जीभ, लावली टाळ्याला – अजित पवार

काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट बारामतीमध्ये येऊन निवडणुका जिंकण्याचं वक्तव्य केलं होतं. ‘बारामतीमध्ये आम्हाला जिंकणं फार काही कठीण नाही’, असं गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीमध्ये गिरीश महाजनांना प्रतिआव्हान केलं आहे. ‘गिरीश महाजन म्हणाले बरामतीत येऊन जिंकू. ये बारामतीला, दाखवतो बारामती काय आहे ते. बारामतीमध्ये लोकं आम्हाला ५० वर्ष निवडून देतायत. लोकांची एक प्रकारची जवळीक असते, उगीच आपलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्याच जळगावमध्ये येऊन अजित पवारांनी हे प्रतिआव्हान दिलं आहे.

- Advertisement -

अजित पवारांनी गिरीश महाजनांना त्यांच्याच जळगावमध्ये जाऊन दिलं आव्हान! Ajit Pawar Ajit Pawar – माणूस जीवाभावाचा Ajit Pawar for Maharashtra AJIT (DADA) Pawar Follower's.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, January 19, 2019


हेही वाचा – निवडणुकांपूर्वी अजित पवार जेलमध्ये जाणार का? या प्रश्नावर दानवे यांची चुप्पी!

गिरीश महाजनांनी स्वीकारलं चॅलेंज!

दरम्यान, सत्तेत नसलेल्या पक्षाच्या अजित पवारांनी सत्तेत असलेल्या पक्षाच्या गिरीश महाजनांना आव्हान दिल्यानंतर त्यांचेही बाहू फुरफुरले आणि त्यांनी देखील अजित पवारांचं आव्हान स्वीकारून शड्डू ठोकले आहेत. ‘जर पक्षाने मला आदेश दिला, तर बारामतीमध्ये येऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन. कारण तिथे काही १०० टक्के बारामती पवारांकडे नाही. त्यामुळे बारामती जिंकणं कठीण नाही’, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यामुळे आता पवार बारामती राखण्यासाठी आणि गिरीश महाजन बारामती जिंकण्यासाठी काय करतात? हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -