घरमहाराष्ट्र'चंपा' शब्द भाजपच्या मंत्र्यानेच दिला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

‘चंपा’ शब्द भाजपच्या मंत्र्यानेच दिला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

Subscribe

निवडणूक झाल्यावरच 'त्या' भाजप मंत्र्याचे नाव सांगेन

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म मला भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यानेच सांगितला, असा दावा अजित पवारांनी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत केला.

चंपा या शब्दावरुन कोथरुडमधील राजकारण चांगलेच गाजत असून अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. पुण्यातील आपल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चंपा या नावाचा उल्लेख करुन चंपाची चंपी करणार असा टोला लगावला आहे. भाजपाचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख विरोधक अनेक सभांमध्ये चंपा असा करत आहेत. चंपा असा उल्लेख सर्वात पहिल्यांदा करणाऱ्या अजित पवार यांनी हा शब्द मी शोधला नसून तो एका भाजपाच्याच कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडून ऐकल्याचे त्यांनी खुलासा केला आहे.

- Advertisement -

पवारांनी पत्रकारांसमोर केला गौप्यस्फोट

‘आमच्या संघटनेच्या एका सहकाऱ्याबरोबर मी काही कामानिमित्त एका मंत्र्यांकडं गेलो होतो. त्यावेळी त्या सहकाऱ्याने मंत्री मोहद्यांना तुमचे शिफारस पत्र असेल तर काम लवकर होईल, कामात जरा मदत होईल, असे सांगितले. त्यावेळी मंत्र्यानी त्या सहकऱ्याला माझे शिफारस पत्राची कितपत मदत होईल ठाऊक नाही. माझे ऐकतील की नाही सांगता येत नाही,’ असे मत व्यक्त केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ‘हे मंत्रीमोहय पुढे म्हणाले, अरे चंपा माझे ऐकत नाहीत. त्यावेळी मी म्हटले काय. बाहेर आल्यानंतर सहकाऱ्याशी बोलताना मला चंपाचा अर्थ उलगडला चंद्राकांतमधील ‘चं’ आणि पाटील मधला ‘पा’ एकत्र करुन त्या भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याने हा शॉर्टफॉर्म बनवल्याचे माझ्या लक्षात आले.’,असे पवारांनी सांगत या ३ ते ४ महिन्यांपुर्वींच्या घटनेचा चांगलाच खुलासा केला आहे.

निवडणूक झाल्यावरच ‘त्या’ भाजप मंत्र्याचे नाव सांगेन

दरम्यान, मात्र, आता चंपाच्या शॉर्टफॉर्ममागे चंद्रकांत पाटील यांच्याच पक्षातील कुणी असल्याचे समोर आल्याने राजकीय तर्कवितर्क बांधले जात असल्याचे दिसतेय. तसेच चंपा हा मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्यानेच सांगितला, असा दावा अजित पवारांनी केला असून या मंत्र्याचे नाव मी निवडणूक झाल्यावरच सांगेन, असे देखील पवारांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -