घरट्रेंडिंगअजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Subscribe

आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडला आहे.

राष्ट्रवादीचे काहीसे नाराज असलेले आमदार अजित पवार यांनी नाराजीच्या मनःस्थितीत भाजपसोबत जात शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या दोन दिवसाच्या कालावधीत राज्याच्या राजकारणात विविध घटना घडल्या. राज्यातील जनतेप्रमाणेच संपूर्ण देशाच्या जनतेचे सुद्धा याकडे लक्ष होते. त्यानुसार आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाडला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर रविवारपासून दोन दिवस त्यावर चर्चा झाली. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. त्यानुसार सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपला २७ नोव्हेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांमध्येच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे कारण देत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -