Tuesday, January 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'एकत्र येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का'?; फडणवीसांचा टोला

‘एकत्र येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का’?; फडणवीसांचा टोला

'एकत्र येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का'?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Related Story

- Advertisement -

सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. हे दोघेही एकत्र येणार असल्याचे कळताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर येताच याचा खुलासा केला आहे. ‘एकत्र येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का’?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच दोन-तीन दिवसांच्या बातम्या चालवायच्या असतील तर तुम्ही माझ्याकडे चहाला या, नाहीतर मला चहाला बोलवा, असे देखील ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले फडणवीस?

‘आम्ही एकत्र येणार म्हणून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. एकत्र काम करणे म्हणजे चार दिवस बातम्या होणे, असे मिश्किल वक्तव्य त्यांनी यावेळी केले. आम्ही एकत्र येणार म्हणून चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे तुम्हीही चहाला बोलवा म्हणजे बातम्या होतील,’ असे देखील फडणवीस पुढे म्हणाले.

- Advertisement -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी अजूनही राज्यात चांगलाच गाजत आहे. त्यांच्या या शपथविधीनंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, पवार आणि फडणवीस यांचे हे सरकार अडीच दिवसात कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींना एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजून विरोधकांकडून या मुद्द्यांवर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे.

दरम्यान, या घडामोडीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने चर्चा रंगली होती. मात्र, त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे.

भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

- Advertisement -

पुण्यातील भामा आसखेड कार्यक्रमात भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एकीकडून देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे अजित पवार यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. त्यामुळे या कार्यक्रमात एकच गोंधळ झाल्याचे दिसून आले.


हेही वाचा – औरंगाबाद नामांतरावरुन सेना-काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’; फडणवीसांचा टोला


- Advertisement -