घरमहाराष्ट्रकडी लावली असती तर आकांशा वाचली असती

कडी लावली असती तर आकांशा वाचली असती

Subscribe

औरंगाबाद येथे एमजीएमच्या वसतीगृहात राहणाऱ्या आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा अनिल देशमुख हिचा गळा दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात सिडको पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातून या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. गेले दोन दिवस सिडको पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक केले होते. मात्र अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमके काय घडले?

औरंगाबाद येथील एमजीएम वसतिगृहात आहे. १० डिसेंबर रोजी या वसतिगृहात आकांक्षा अनिल देशमुख ही विद्यार्थींनी झोपली होती. त्या दरम्यान राहुल शर्मा हा इसम चोरी करण्याच्या उद्देशाने वसतिगृहात शिरला. त्यांनी वसतिगृहातील सर्व खोल्यांचे दरवाजे ढकलून पाहिले. मात्र सर्व विद्यार्थ्यांनी दरवाजे लावून त्या झोपल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांनी वसतिगृहातील एका खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र तो दरवाजा कोणीही उघडला नसल्याने त्यांनी दुसरा दरवाजा ठोठावण्यास गेला असता तो दरवाजा उघडाच असल्याचे त्याच्या लक्षात आले. आकांक्षा दरवाजा लोटून आत झोपली होती. याच संधीचा फायदा घेत राहुल हा आरोपी आकांक्षाच्या खोलीत शिरला. त्याला पाहून आकांक्षाला जाग आली. राहुलने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकांक्षाने त्या विरोध केला. आकांक्षा आरडोओरड करुन विरोध करत असल्याने राहुलने तिचा गळा दाबून निर्घुण खून केला आणि त्यातच आकांक्षाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

चोरीसाठी केली हत्या

एमजीएमच्या वसीगृहाच्या बाजूलाच राहु शर्मा (२२) हा तरुण मजुराचा काम करायचा. राहुला कमी वेळात पैसे कमवायचे होते. त्यामुळे त्यांने चोरी करण्याचे ठरवले. ज्या ठिकाणी राहुल काम करत होता. त्याच परिसरात एमजीएमचे वसीगृहत होते. या वसतिगृहात त्यांनी चोरी करण्याचा विचार करुन तो १० डिसेंबर रोजी वसतिगृहात शिरला. मात्र वसतिगृहातील सर्वच खोल्या बंद होत्या. त्यातील आकांशा हीची खोली उघडी असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आकांशावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला परंतु आकांशाने विरोध केल्याने तिचा राहुलने खून केला. त्यांनंतर त्यांनी तिच्या घरात काहीतरी मिळेल याकरता संपूर्ण खोली पालथी घातली. परंतु त्याला काहीच न मिळाल्याने अखेर तो तिथून निघून वसतिगृहाच्या गच्चीवर गेला आणि सकाळ झाल्यानंतर त्यांनी थेट वाराणसी गाठलं.


वाचा – वसतीगृहात विद्यार्थीनीची गळा दाबून हत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -