घरमनोरंजन'वारी'ने झाला संमेलनाचा समारोप; गडकरी, तावडेंचा युटर्न

‘वारी’ने झाला संमेलनाचा समारोप; गडकरी, तावडेंचा युटर्न

Subscribe

रविवारी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या तिसऱ्या आणि अखेरचा दिवशी ‘संमेलनाची वारी’ हे प्रमुख आकर्षण ठरलं. नाटय़ संमेलनाच्या इतिहासातील संमेलनाध्यक्ष तसंच यंदाचे अध्यक्ष यांच्या कर्तृत्वाची दखल या आगळ्या वेगळ्या ‘वारी’मधून घेण्यात आला. नागपूर शाखेने निर्मिती केलेल्या या कार्यक्रमात   शहरातील सुमारे २०० कलाकारांनी  सहभाग घेतला होता.

संमेलनाच्या अखेरच्या टप्प्यातील कलाप्रकारांची सुरुवात झाली ती मध्यरात्री १ वाजता ‘अस्सा नवरा नको गं बाई’ या विनोदी नाटकाने. त्यानंतर सकाळी ९ वाजता अमरावती शाखेच्यावतीने ‘मोमोज’ ही अनोखी एकांकिका सादर करण्यात आली. त्यानंतर नवोदित कलावंतासाठी एकपात्री सादरीकरणाचा खुला कार्यक्रम पार पडला. तर ११ च्या सुमारास  ‘संमेलनाची वारी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

- Advertisement -

‘मराठी रंगभूमी – उणे मुंबई पुणे’

दुपारच्या सत्राची सुरुवात झाली ती ‘मराठी रंगभूमी – उणे मुंबई पुणे’ या परिसंवादाने. यामध्ये रजनिश जोशी, हिमांशू स्मार्त, मुकुंद पटवर्धन, वानम पंडित, डॉ. दिलीप घारे, दत्ता पाटील, क्षितिज झावरे, डॉ. सतीश पावडे, डॉ. सतीश साळुंके, सलीम शेख आणि विवेक खरे आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.

‘मराठी नाटक हे मुंबई, पुण्यासारख्या शहरी कोंदणाच्या बाहेर पडण्याची गरज आहे आणि खरं नाटक हे गावा-खेड्यांकडेच आहे’, यावर तज्ञांचे एकमत झाले. मोठ्या शहरांमध्ये नाटकाला जितकी प्रसिद्धी मिळते, त्यांची जितकी जाहिरात केली जाते.. तितकीच किंबहुना त्याहून अधिक प्रसिद्धी आणि मान-सन्मान ग्रामीण  भागातील नाटकांना मिळेल आणि त्यातूनच ही नाटकं जगासमोर येतील’… असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. 

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या दाहक व्यथा – ‘तेरवं’

संमेलनाच्या तिसऱ्या दिसवशीचं दुसरं मुख्य आकर्षण ठरला हा दीर्घाक. याचं वैशिष्ट्य म्हणजे वास्तवात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा सुना आणि मुलींनी या नाटकात काम केले. ‘तेरवं’च्या माध्यमातून या पीडितांनी आपली ज्वलंत व्यथा मांडली. याचं लिखाण श्याम पेठकर यांनी तर दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या बालकलाकारांनी सादर केलेला गीतरामायण कार्यक्रम संपन्न झाला.

गडकरी, तावडेंचा यूटर्न

नाट्य संमेलनाच्या अखेरच्या टप्प्यात खुले अधिवेशन घेण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणामुळे या  दिग्गजांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. यादरम्यान ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचा औपचारिक समारोप सोहळा पार पडला.
खुल्या अधिवेशनादरम्यान मुलुंड येथे पार पडलेल्या ९८ व्या नाट्यसंमेलनापासून ते यंदाच्या ९९ व्या संमेलनापर्यंत संपूर्ण देशातील ज्या कलाकारांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याशिवाय राजकारणातील असाधारण वयक्तिमत्व असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनाही श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात ज्या रंगकर्मींना कला क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले त्यांचे जाहीर अभिनंदन आणि कौतुकही करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी यावेळी राज्यभरातील अनेक रंगकर्मींचा सत्कार देखील केला.
संमेलनाच्या समारोपानंतर रात्री ‘स्वरानंदनवन’ हा संगीत कार्यक्रम पार पडला. आनंदवनच्या महारोगी सेवा समितीमधील कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. तर २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता प्राजक्ता देशमुख दिग्दर्शित ‘मुक्ती’ हा कार्यक्रम सादर झाला आणि संमेलनाची सांगता झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -