घरट्रेंडिंगमध्यरात्री जखमी प्रवाशासाठी लोकल थांबते तेव्हा, मोटरमन गार्डचा मदतीचा हात

मध्यरात्री जखमी प्रवाशासाठी लोकल थांबते तेव्हा, मोटरमन गार्डचा मदतीचा हात

Subscribe

चुनाभट्टी स्थानका नजीक जखमी अवस्थेतील विनायक परब या तरूणाला वेळीच मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

एरव्ही सुसाट धावणाऱ्या मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात थोडाही उशिर झाला तरीही प्रवाशांचा संताप होतो. त्याचा राग अनेकदा रेल्वे कर्मचाऱ्यांवर काढण्यात येतो. पण याच रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एका लोकल प्रवाशाचा जीव वाचवण्यात मोठी मदत मिळाली. एका अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाला मध्यरात्री लोकल थांबवून केलेल्या मदतीमुळे त्या रूग्णाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

एखाद्या अपघातानंतर गोल्डन अवर्समध्ये जर तत्काळ मदत मिळाली तर जखमी रूग्णाचा जीव नक्कीच वाचू शकतो. मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनच्या प्रवासात झालेल्या अपघातात वेळीच मोटरमन आणि गार्डने मदतीचा हात दिल्या एका प्रवाशाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मोटरमन आणि गार्डच्या समयसूचकतेमुळे हार्बर मार्गावर घडलेल्या अपघातात विनायक परब या २८ वर्षीय तरूणाचे जीव वाचवण्यात यश आले आहे. वेळीच मदत मिळाल्याने या प्रवाशाला पुढील उपचारासाठी हलवण्यासाठी मोलाची मदत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे झाली. मोटरमन आणि गार्डने आपली लोकल प्रवाशांना सुरक्षितपणे नेण्याची ड्युटी बजावतानाच एका जखमीलाही वेळीच केलेल्या मदतीमुळे एक मोठी मदत त्या रूग्णाला मिळण्यासाठी शक्य झाले.

- Advertisement -

शनिवारी मध्यरात्री एक वाजता हार्बर मार्गावर प्रवासादरम्यान विनायक परब हा तरूण चुनाभट्टी स्थानकानजीक रूळांच्या बाजुला जखमी अवस्थेत पडला होता. गाडी चुनाभट्टी स्टेशनवरून निघताच जखमी अवस्थेत पडलेला तरूण लोकलच्या मोटरमनला दिसला. तत्काळ लोकल थांबवून या तरूणाला मोटरमन आणि गार्डने लोकलच्या डब्यामध्ये आणले. प्रवाशांच्या मदतीने या तरूणाला कुर्ला स्थानकापर्यंत नेण्यात आले. त्यानंतर सायन रूग्णालयात या रूग्णाला रेल्वे पोलिसांच्या मदतीने पाठवण्यात आले. मोटरमन सुर्यकांत पाटील आणि गार्ड बबलू कुमार यांनी वेळीच दिलेल्या मदतीच्या हातामुळे विनायक परब यांचे प्राण वाचवण्यात यश आले.
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाही अशाच प्रकारची घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -