घरमहाराष्ट्र'काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही'; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

‘काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही’; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

Subscribe

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी या गावात जावून शरद पवार यांनी तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली असून 'सध्या काळ कठिण असला तरी देखील आपण हरायचं नाही', असा विश्वास शरद पवारांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला आहे.

आज संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. काळ कठिण आहे. मात्र, आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेवू आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी स्थिती येवू नये म्हणून प्रयत्न करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांमध्ये निर्माण केला आहे.

शरद पवारांनी नागेवाडीतील दुष्काळाची केली पाहणी

आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी या गावात जावून शरद पवार यांनी तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली त्यावेळी ते बोलत होते. ‘संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं‘, असा आत्मविश्वास शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या मनात जागृत केला आहे. यावर्षी पाऊस उशिरा येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नंतर पाऊस चांगला पडेल, असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडेल परंतु त्यासाठी आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पावसाचा थेंब न थेंब वाचण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबहुना आपण हे वाढवलं पाहिजे, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

आज अनेक गावांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही, अशी तक्रार आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी, अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला आहे.


वाचा – पार्थची जागा न येणारीच होती – शरद पवार

- Advertisement -

वाचा – ज्यांच्या हाती सत्ता, ते हिमालयात! – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -