महायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा

Dolby bans reconsideration
चंद्रकांत पाटील

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर दावे प्रतिदावांना सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला २२० पेक्षा जास्त जागा मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्राला मिळालेल्या प्रतिसाद लक्षात घेता या जागा येतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तर आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यानंतर आता महायुतीला नेमक्या किती जागा मिळतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील माहिती दिली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद उर्स्त्फूत असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केली. तर निवडणूक प्रचारात फडणवीस सरकारने पाच वर्षात केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडू, असे सांगितले.

गेल्या पाच वर्षातील विविध निवडणुकीत भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. भाजप महायुती सरकारचे काम आणि पक्षाची पाच वर्षातील संघटनात्मक तयारी यामुUे आम्हाला आगामी निवडणुकीत नक्की यश मिळेल, असेही पाटील म्हणाले. तर भाजप-शिवसेनेच्या युतीविषयी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुUे युतीची घोषणाही लवकरच होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.