घरमहाराष्ट्रमैदानावर जाण्यासाठी आता प्रवेश शुल्क

मैदानावर जाण्यासाठी आता प्रवेश शुल्क

Subscribe

गेल्या १ डिसेंबरपासून सरकसट सर्वांनाच प्रति माह १०० रुपये शुल्क आकारल्या जात आहे.

विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर जाण्यासाठी आता १०० रुपये प्रतिमाह प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. देखभालदुरुस्तीच्या कारणामुळे हे शुल्क आकारण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी मैदानावर फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवननजिक असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात इनडोअर, तर मैदानात आउटडोअर खेळ होतात. संकुलाच्या परिसरातील मैदान मोठे असल्याने मॉर्निंग वॉकसाठीही नागरिक जातात. अनेक नागरिक येथे योगा करण्यासाठीही येतात. सोबतच काही खासगी क्रीडा प्रशिक्षक येथे खेळाडूंना प्रशिक्षण देतात. यापैकी कुणालाही आतापर्यंत शुल्क आकारले जात नव्हते; मात्र गेल्या १ डिसेंबरपासून सरकसट सर्वांनाच प्रति माह १०० रुपये शुल्क आकारल्या जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. संबंधित प्रभागाचे नगरसेवक श्रीचंद तेजवाणी यांनीही आज क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांच्याशी चर्चा केली. 

खासगी प्रशिक्षक खेळाडूंकडून प्रशिक्षण शुल्क घेत असल्याने त्यांच्याकडून शुल्क आकारल्यास हरकत नाही; मात्र केवळ योगासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क घेणे चुकीचे असल्याचा युक्तीवाद आता नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीच्या निर्णयानुसार हे शुल्क आकारण्यात येत असून, तसेही तीन ते चार महिने उशिरा शुल्क लागू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली..देखभालदुरुस्तीच्या खर्चासाठी शुल्क आवश्यक.मैदानावर येण्यासाठी प्रवेश शुल्क आकारुन उत्पन्न मिळविण्याचा आमचा हेतू नाही. एवढ्या मोठ्या मैदानाची, वास्तूची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी आमची आहे. शासनाकडून त्यासाठी स्वतंत्र निधी दिल्या जात नसून, तसे शासनाचे धोरणच आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठीच लागू आहे. आमचे स्वतंत्र उत्पन्न नाही. त्यामुळे मैदानाची निगा राखणे, प्रसाधनगगृहाची व्यवस्था ठेवणे, रंगरंगोटी व दुरुस्तीच्या कामांसाठी शुल्क आकारणे आवश्यक असल्याचं क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी सांगितले. 


वाचा:  ‘गुंडाराज नको’; मुख्यमंत्र्यांचा गोटेंना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -