Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शक्ती कायदा प्रभावी करण्यासाठी सूचना पाठवा; गृहमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

शक्ती कायदा प्रभावी करण्यासाठी सूचना पाठवा; गृहमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

शक्ती फौजदारी कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी सुधारणा आणि सूचना पाठवण्याचे आवाहन अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

Related Story

- Advertisement -

माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता शक्ती हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन समिती प्रमुख तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. सदर विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा अन्य काही सुधारणा सुचवू शकतात.

या विधेयकाच्या मराठी आणि इंग्रजी प्रति शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय चर्नी रोड मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत www.mic.org.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई येथे किंवा [email protected] या ईमेलवर १५ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात माणुसकीचा उष:काल; गृहमंत्र्यांकडून गंगापूर पोलिसांचे कौतुक


 

- Advertisement -