घरदेश-विदेशअमेरिका करोना संसर्गाचे नवे केंद्र

अमेरिका करोना संसर्गाचे नवे केंद्र

Subscribe

जगात करोनाग्रस्तांची संख्या झाली साडेपाच लाख

चीनपासून सुरू झालेल्या करोनाच्या संसर्गाने अवघ्या जगाला वेढले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे.शुक्रवारी जगातील करोनाग्रस्तांची संख्या ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी झाली आहे. त्यापैकी २४ हजार ८३३ मृत्युमुखी पडले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ७०१ इतकी आहे. दरम्यान, जागतिक महासत्ता अमेरिका करोनाचा संसर्गाचे नवे केंद्र झाले असून चीन, इटलीलाही मागे टाकले आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्यानंतरही अमेरिकेत करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

गुरुवारी एकाच दिवसात अमेरिकेत १७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले. अमेरिकेत आतापर्यंत ८५ हजार ७४९ करोनाबाधित आढळले आहेत. तर, चीनमध्ये ८१ हजार ३४० आणि इटलीत ८० हजार ५८९ इतके करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत करोनामुळे १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये ३२९२ आणि इटलीत सर्वाधिक ८२१५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मागील आठवड्यात ८ हजार करोनाचे रुग्ण आढळले होते. तर, या आठवड्यात बाधितांची संख्या ८५ हजार झाली आहे. एकाच आठवड्यात करोनाबाधितांची संख्या १० पटीने वाढली आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्कमध्ये करोनाचा संसर्ग सर्वाधिक झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल ३८ हजार ९७७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ४६६ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण खाटा उपलब्ध नाहीत. न्यूयॉर्कचे गर्व्हनर अ‍ॅण्ड्र्यू काओमो यांनी सांगितले की, निवृत्त झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय न्यूयॉर्कमध्ये ३० हजार स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. एवढे स्वयंसेवक तरी किती काम करतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यूजर्सीमध्ये ६ हजार ८७६, कॅलिफोर्नियात ४ हजार ४४ जणांना करोनाची बाधा झाली आह

ब्रिटनच्या पंतप्रधान पॉझिटिव्ह
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची बाधा झाली. त्यांनी शुक्रवारी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांना करोनाची बाधा झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. मागील २४ तासांत त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -