घरमहाराष्ट्रमोदी सरकारच्या कामांचे समर्थन करण्याचा संदेश घेऊन जा - अमित शहा

मोदी सरकारच्या कामांचे समर्थन करण्याचा संदेश घेऊन जा – अमित शहा

Subscribe

'महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. मला इथे निवडणुकीचा प्रचार करायचा नाही. मात्र, ही भगवान बाबांचीच कृपा आहे की, निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी सभा ही भगवान गडावर ओबीसी आणि वंचित समाजासमोर आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर देश चार पटाने प्रगती करत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच वंचित समाजाचा विकास करण्याचे काम मोदी सरकार करत आहे', असे अमित शहा म्हणाले.

‘भगवान गडावर आलेल्या सर्व भक्तांनी कलम ३७० रद्द करण्याच्या कायद्याला समर्थन करण्याचा संदेश घेऊन जावे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. आज बीडच्या सावरगाव येथील भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा भगवान गडावर आले होते. मात्र, आपण प्रचारासाठी दसरा मेळाव्यात आलो नसल्याचे अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज्यभरातून आलेल्या भगवान बाबांच्या भक्तांना अमित शहा यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. ‘महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. मला इथे निवडणुकीचा प्रचार करायचा नाही. मात्र, ही भगवान बाबांचीच कृपा आहे की, निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी सभा ही भगवान गडावर ओबीसी आणि वंचित समाजासमोर आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर देश चार पटाने प्रगती करत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच वंचित समाजाचा विकास करण्याचे काम मोदी सरकार करत आहे’, असे अमित शहा म्हणाले. ‘आजच्या दिवशी पाच वर्षांपूर्वी मी दसऱ्याला भगवान गडावर आलो होतो. त्यानंतर मी पुन्हा पाच वर्षांनी भगवान बाबांच्या जन्मस्थळी त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना नमन करण्यासाठी पुन्हा एकदा भगवान गडावर आलो आहे’, असेही अमित शहा म्हणाले.

हेही वाचा – ऊसतोड शेतकऱ्यांच्या हातातील कोयता बाजूला करणार – पंकजा मुंडे

- Advertisement -

‘कलम ३७० रद्द करण्याच्या कायद्याला समर्थन करण्याचा संदेश घेऊन जा’

‘काश्नीरमध्ये कलम ३७० रद्द केले. ते योग्य केले की नाही? त्यामुळे जे या निर्णयाला विरोध करतात त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार का? नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करुन राष्ट्रभक्ती जागवली आहे. मोदी सरकारने कलम ३७० आणि कलम ३५ ‘अ’ रद्द करण्याचा निर्णयाचे समर्थन करण्याचा संदेश आज संपूर्ण भगवान भक्तांनी येथून घेऊन जावे’, असे अमित शहा म्हणाले. ‘७० वर्षांपासून ओबीसी समाजाला त्यांचा संविधानिक दर्जा देण्याचा काम जे सरकार करत नव्हते त्यांना योग्य दर्जा देण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले. ओबीसी समाजासाठी संविधानीक आयोगाची रचना करण्याचे काम मोदी सरकारने केले. जे लोक ओबेसीच्या नावाने राजकारण करतात त्यांनी आतापर्यंत हे काम का नाही केले? भाजपने ओबीसी आयोग बनवण्याचे काम केले. देशभरातील वंचित समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार काम करत आहे’, असेही अमित शहा म्हणाले.

हेही वाचा – भगवान गडावर भाजपचा दसरा मेळावा

- Advertisement -

‘भगवान बाबांनी वंचितांसाठी शिक्षा, संघर्ष आणि सन्मानाचा रस्ता दाखवला’

‘भगवान बाबांनी वंचितांसाठी शिक्षा, संघर्ष आणि सन्मानाचा रस्ता दाखवला. समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी त्यांनी कामे केली. मात्र, आपल्या सर्वांगिन विकासासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे माध्यम आहे, याची जाणीव त्यांनी करुन दिली. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यथित केले. अशाप्रकारे आमचे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबांच्या पायावर पाय ठेवून वंचित समाजासाठी काम केले. याशिवाय मला आनंद आहे की, भगवान बाबा, गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गाने पंकजा मुंडे ताई देखील महाराष्ट्रातील सर्व वंचितांसाठी कामे करीत आहेत. ऊसतोड, साखर कारखान्यात काम करणारे कामगार यांचे आयुष्य सुधारण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले. आज पंकजा ताई देखील त्याच वाटेने वंचितांना पुढे घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध आहेत’, असे अमित शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -